डोंगरगाव येथे गावठी हातभट्टीवर पोलिसांची धाड

अवैध हातभट्टीवर पोलिसांचे धाडसत्र सुरू

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव पारधी बेड्यावरील गावठी हातभट्टी पोलिसांनी धाड टाकून कार्यवाही केली आहे.

डोंगरगाव पारधी बेड्यावर हातभट्टीची दारू काढत असल्याची तक्रार स्थानिक महिलांनी पोलीस स्टेशनला केली होती. याच अनुषंगाने पोलिसांनी आपली फिल्डिंग लावून ठेवली होती. दरम्यान याबाबतची पोलिसांना गुप्त माहिती मिळताच आज १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डोंगरगाव बेड्यावर जाऊन वामन विठोबा पवार यांच्या घरी धाड टाकली.

या धाडीत ९ किलो मोहफुल १५ किलो सडवा किंमत १२०० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपी वामन पवार याला अटक करून त्याविरुद्ध कार्यवाही करण्यात आली.

सदर कार्यवाही ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली एसआय शशिकांत नागरगोजे पुरूषोत्तम घोडाम अशोक नैताम रंजना सोयाम जितेश पांनघाटे मोहन कुडमेथे रमेश मस्के नीरज पातूरकर व प्रदीप कवरासे यांनी केली.

HathbhattiLead StoryMukutban
Comments (0)
Add Comment