मारेगाव नगर पंचायत विरोधात घंटानांद आंदोलन

अतिक्रमण धारकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप

भास्कर राऊत, मारेगाव: स्थानिक प्रभाग क्र. ८ मधील नागरिकांनी नगर पंचायत मारेगाव विरोधात, अतिक्रमण धारकास  पाठीशी घालत असल्याचा ठपका ठेवत ता. 15 ऑगस्ट  पासून  तथा विविध मागण्या घेऊन नगर पंचायत प्रांगणात “घंटानांद आंदोलन” चालू केले आहे.

अधिकार तथा पदाचा दुरुपयोग करत अतिक्रमण धारकास पाठीशी घातल्याचा ठपका ठेवत , प्रभागात  सिमेंट कोंक्रेट रस्त्याचे बांधकाम इस्टीमेट प्रमाणे करण्यात आले नसुन  ईस्टीमेट प्रमाणे या रोडचे पुन्हा बांधकाम करा या मागण्यासाठी प्रभाग क्र.८ मधील नागरिकांनी नगर पंचायत समोर स्वातंत्र्य दिनापासुन “घंटानांद आंदोलन” सुरु केले आहे.

आंदोलन कर्ते गजानन चंदनखेडे,विनोद बदकी,शब्बीर खा पठाण,मारोती देवाळकर,बंडू मत्ते,दिनेश सरवर,राजू बदकी,मनोज पेंदोर यांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे.

हे देखील वाचा:

फॅशन व इंटेरिअर डिझायनिंगसाठी मोफत डेमो क्लासेस

GhantanadGhantanad AndolanLead Story
Comments (0)
Add Comment