वणीत आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा

गोदावरी अर्बन तर्फे शहरातील विधिज्ञांचा सत्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को -ऑपरेटिव्ह सोसायटी लि. नांदेड, शाखा वणीतर्फे शनिवारी दिनांक 17 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शहरतील विधिज्ञांचा सत्कार करण्यात आला.

वणीतील निवृत्त न्यायाधिश ऍड. वसंता कावडे तसेच वणीतील ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. रजा हुसैन हैदरी, ऍड विनायक एकरे, ऍड ज्ञानेश्वर कातकडे, ऍड अमोल गौरकार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वणी शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लि नांदेड सामाजिक बांधिलकी जपून विविध सामाजिक उपक्रम कायमच राबवत असते. संस्थापकीय अध्यक्ष हेमंत पाटील, संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटिल, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनात हे राज्यातील ठिकठिकाणच्या शाखेत राबवले जातात.

हे देखील वाचा:

अबब… तब्बल 2 लाखांची दारू केली नष्ट…

रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक जप्त

Godavari UrbanGodavari Urban BankLead Story
Comments (0)
Add Comment