पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज रविवारी दिनांक 18 जून रोजी दुपारी 12 वाजता शेतकरी मंदीर येथे स्वर्गीय बाळू धानोरकर यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली दिली जाणार आहे. बाळू धानोरकर मित्र परिवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिक व सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिका-यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.