प्रा. देवीदास गायकवाड यांच्या कवितेला पुरस्कार

सुशील ओझा, झरी: अखिल भारतीय साहित्य परिवार तर्फे महाराष्ट्रदिना निमित्त आयोजीत भव्य खुल्या स्वरचित ऑनलाइन काव्य लेखन स्पर्धेत प्रा. देविदास गायकवाड यांच्या ‘नटलं थटलं महाराष्ट्र’ या कवितेला द्वितीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. प्रा.देविदास गायकवाड़ हे परिसरातील सुपरिचित कवी असून त्यांचा ‘शिक्षण आमचा देव’ हा काव्य संग्रह प्रसिद्धीच्या वाटेवर आहे. या पूर्वी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांनी शेतकरी जीवन शिक्षण, गरीबी ईत्यादी विषयवार काव्य लेखन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हे देखील वाचा:

करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

Devidas GaikwadLead Story