बोरगाव फाट्याजवळ अपघात, एक जागीच ठार

लोकमान्य टिळक महाविद्यालयातील लिपिक ठार

रोहण आदेवार, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या बोरगाव फाट्याजवळ दुचाकीचा अपघात होऊन त्यात एक जण जागीच ठार झाला आहे.

विवेक गुलाबराव मोडक (53) राहणार भीमनगर वणी येथील रहिवासी हे लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे लिपिक म्हणून कार्यरत होते. कामानिमित्त ते कोरपन्याला गेले होते. दुपारी 4 वाजताच्या सुमारास ते दुचाकीने कोरपन्यावरून वणीला येत होते. वाटेत बोरगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात होताच पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली. मात्र रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा पुढील तपास सुगत दिवेकर, नाईक कॉन्टेबल शिरपूर करीत आहेत.

lead stioryLead Story
Comments (0)
Add Comment