वणीत जेसीआयची सायकल रेस गुरुवारी

हजारो रूपयांची बक्षिसे

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः जेसीआय वणी सिटी झोन क्र 13 द्वारा गुरुवार 19 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजता सायक्लॉथॉन या सायकल स्पर्धेचे पाण्याच्या टाकीच्या शासकीय मैदानापासून आयोजन करण्यात आले आहे. एकूण आठ किलोमिटर अंतराच्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ आणि बक्षिसांची लयलूट करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी याचे नोंदणी शुल्क केवळ दहा रूपये असून अन्य 25 वर्षांवरील स्पर्धकांसाठी हे शुल्क 20 रूपये राहील.

सात ते 25 या वयोगटासाठी पहिले बक्षिस रू. 3100, दुसरे बक्षिस रू. 2100, तिसरे बक्षिस रू.1100. या गटात मुलांकरिता व मुुलींकरिता ही सर्व बक्षिसे स्वंतत्र देण्यात येईल. 25 ते 50 या गटात व तिसऱ्या गटात वरीलप्रमाणेच बक्षिसे राहतील.

सोबतच उत्कृष्ट सायकल सजावटीची तीन बक्षिसे, पर्यावरणपूरक सुविचारांसाठी तीन बक्षिसे, उत्कृष्ट वेशभूषेची दोन बक्षिसे देण्यात येतील. सहभाग्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात येईल.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी 8668322502 या मोबाईलनंबरवर संपर्क साधण्याची विनंती शहाबुद्दीन अजाणी यांनी वणी बहुगुणीशी बोलताना केली आहे.

cyclothonInduwamanjciraceWani
Comments (0)
Add Comment