वणी मतदार संघातून 1100 रामभक्त जाणार अयोध्या

राजू उंबरकर यांची माहिती

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. 5 जून रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत. त्या अनुषंगाने प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी वणी मतदार संघातून 1100 रामभक्त 5 जून रोजी अयोध्येला जाणार, अशी माहिती मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिली आहे.

राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला आहे. गुडीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पक्षाच्या बदलत्या धोरणाचे संकेत दिले होते. याच मेळाव्यात प्रभू श्रीरामच्या दर्शनासाठी लवकरच अयोध्येला जाणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. मात्र आता 5 जून तारीख ठरल्यानंतर राज्य भरातील हजारो महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक अयोध्या जाण्याच्या तयारीत लागले आहे.

वणी मतदारसंघात मनसेचा चांगला प्रभुत्व आहे. नुकतेच मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात शेकडो मनसैनिक मुंबई येथे गुडीपाडव्याच्या मेळाव्यात सामील झाले होते. राज्यातील लाखो मनसैनिक 5 जून रोजी अयोध्या गमनाची तयारी करीत असून वणी मतदार संघातुनही 1100 रामभक्त मनसैनिक अयोध्येला जाणार आहेत. अशी माहिती राजू उंबरकर यांनी पत्रकारांना दिली.

Lead Storymns ayodhya daura