मुकूटबन येथे प्रहार जनशक्ति पक्षाची शाखा स्थापना

अध्यक्षपदी महंमद फैज यांची निवड

सुशील ओझा, झरी: रविवारी मुकूटबन येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेची स्थापना करण्यात आली. प्रहार पक्षाचे तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते मुकूटबनच्या अध्यक्ष पदी महंम्मद फैझ यांची नियुक्ति करण्यात आली. सदर नियुक्ती ही प्रहार जनशक्ति पक्ष प्रमुख बच्चु भाऊ कडु, महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोद भाऊ कुदळे व जिल्हाध्यक्ष विलास पवार यांनी फैज यांच्या कार्याच्या आधारे नियुक्ती केली आहे.

येणाऱ्या काळातच मुकूटबन येथे नक्कीच विकासाची नाळ या प्रहार जनशक्ति पक्ष द्वारे जोळली जाणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता, विद्यार्थांचे प्रश्न तसेच बेरोजगारी वर आधारित सर्व समस्यांचा तोडगा काढण्याकरिता या पक्षाचा लढा राहणार आहे. तसेच सामाजीक कामे व गोरगरीब जनतेच्या रखडलेल्या योजना पुरेपुर पोहोचविण्याकरीता, शेतमालाला भाव तसेच सामाजीक समस्या व दैनंदिन जनतेच्या विकासाचा खुंटलेला पायाची वाट बदलुन एक उज्वल विकास करण्याकरीता हा पक्ष सदैव खंबिररीत्या कार्यरत राहील. अशी प्रतिक्रिया फैज यांनी दिली.

MukutbanPrahar
Comments (0)
Add Comment