वणीत 23 डिसेंबरला ब्युटी सलून सेमिनार

गिरीश कुबडे, वणी: महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा   वणीच्या वतीने भव्य एक दिवसीय ब्युटी  सलून सेमिनारचे  आयोजन  येत्या  23 डिसेंबर  रोजी  वसंत  जीनिंग हॉल  शेतकरी  मंदिर  येथे करण्यात  आले  आहे. यात तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभणार आहे.

मुंबई  येथील  उदय टक्के  यांचे  शिष्य  अहमदनगर  येथील  सागर  जोटी  यांचे  हस्ते भव्य  एक  दिवसीय  ब्युटी सलूनचे  सेमिनार  घेण्यात  येत आहे. या  कार्यक्रमाला  सलून व्यावसायीक  व  तसेच  लेडीज ब्युटी  पार्लर  यांनी  मोठ्या संख्येने  उपस्थितीत  राहून कार्यक्रमाचा  लाभ  घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर अध्यक्ष बंटी खटले , प्रभाकर कडूकर , स्वप्नील सर्वे ,  जितेंद्ध घुमे, निखिल  मांडवकर,  प्रज्वल नागपुरे, सचिन  हनुमंते,  निखिल कडूकर, सूरज  नक्षीणे  व  जिल्हा कार्याध्यक्ष  शशिकांत  नक्षीणे आणि सदस्य परिश्रम घेत आहे.

Lead Storysaloon workshop
Comments (0)
Add Comment