वणीत बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनी अभिवादन

ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले फळवाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. आज गुरुवारी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी पहाटे नगर सेवा समितीच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या नांदेपेरा रोडवरील स्मृतीस्थळाला जलाभिषेक व पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर सकाळी 11 वाजता वणीतील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी किशोर नांदेकर, सुधाकर गोरे, राजु तुराणकर, मनिष सुरावार, टिकाराम खाडे, ललित लांजेवार, विकी चवणे, मंगल भोंगळे, जनार्दन थेटे, राहुल झट्टे, देवेंद्र दोडावार, नीरज सोनुले, प्रेमानणंद ढवळे, हेमंत गौरकार, ओम क्षीरसागर इत्यादींची उपस्थिती होती.

Lead Story