कुर्ली येथे विकास कामांचे भूमिपूजन

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील कुर्ली येथे गावातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा दि.१३ शनिवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते. याप्रसंगी ग्रामपंचायत इमारत, सभामंडप आणि पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हापरिषद सदस्य विजय पिदूरकर, पंचायत समिती वणीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते, दिनकर पावडे, शांतीलाल जैन, सरपंच नीता बांदूरकर, शिंदोलाचे सरपंच विठ्ठल बोन्डे, ग्रामसेवक पेटकुले यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक पेटकुले यांनी केले. ग्रामस्थांच्यावतीने प्रफुल बांदूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन अंकुश ढेंगळे केले. आभार राहुल जुनगरी यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

kurliLead Story
Comments (0)
Add Comment