जामणी येथे १० व १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन

स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जामणी येथे स्वातंत्र्यदिनी १० वी आणि १२ ला चांगले गुण घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव झाला. गुणवंत विद्यार्थ्यांचा युवा संघटनमार्फत सत्कार करण्यात आला. त्यांच्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.10मध्ये साहिल शरद वडस्कर याने सर्वाधिक 90.80 टक्के गुण प्राप्त केलेत. 12 मध्ये कु. निकिता पुंजाराम गुरनुले हिने सर्वाधिक ७७ टक्के गुण प्राप्त केलेत.

गुणवंत विद्यार्थांना मडावी, माहुरे व वकील दीपक काटकर यांनी मार्गदर्शन केले. युवा संघटनेचे कार्यकर्ते विनोद मेश्राम, निखिल वनकर, महेश गेडाम, प्रवीण लेनगुळे, सूरज लेनगुळे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेत.

felicitatedjamajiLead StorysanghatanascholarsYuva
Comments (0)
Add Comment