आदर्श हायस्कूल शिंदोला येथे स्वातंत्र्य दिन साजरा

सर्पमित्रांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सुरेन्द्र इखारे, वणी: आदर्श हायस्कूल शिंदोला येथे 72 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण मुख्याध्यापक जयंत साठे यांचे हस्ते पार पडले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पं स. सदस्य संजय निखाडे उपसरपंच किनाके शकुंतला गिरी ग्रामपंचायत सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

याप्रसंगी सर्पमित्रांनी विषारी व बिनविषारी सापांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जयंत साठे तर मार्गदर्शक म्हणून सर्व सर्पमित्र आतिश शेंडे, योगेश केळझरकर, विशाल टेकाम, गजानन ठाकरे यांनी सापांबाबतचे गैरसमज दूर केले.

Lead StoryShindola
Comments (0)
Add Comment