विजय पिदूरकर यांची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

11 हजारांचा चेक एसडीओंना सुपुर्द

तालुका प्रतिनिधी, वणी: माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे नेते विजय आनंदराव पिदूरकर यांनी कोविड – १९ या जागतिक आपत्तीमध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. पुतण्या पंकज संजय पिदूरकर यांचे स्मृती प्रित्यर्थ विजय पिदूरकर यांनी सोमवारी ११ हजार रुपयांचा धनादेश वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्याकडे सुपुर्द केला.

सध्या कोरोनामुळे देशावर मोठे संकट आले आहे. व्यापार, उद्योगधंदे बुडाले आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोना दरम्यान आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री सहायता‍ निधी (कोविड-19) या नावाने अकाउंट उघडण्यात आले आहे. वणीतही या निधीसाठी भरभरून मदत केली जात आहे.

वणी  बहुगुणी आता टेलीग्रामवर आहे. आपलं चॅनेल (@Wani Bahuguni) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि वणी व परिसरातील ताज्या  व महत्त्वाच्या बातम्या आणि घडामोडी मिळवा.

CM FundVijay Pidurkarमुख्यमंत्री सहायता निधीविजय पिदूरकर
Comments (0)
Add Comment