मारेगाव तालुक्यात कोरोनाचे 38 रुग्ण तर 92 रुग्णांची कोरोनावर मात

ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही घट, तालुक्याला दिलासा

नागेश रायपुरे, मारेगाव: आज सोमवारी दिनांक 17 मे रोजी तालुक्यात 38 पॉझिटिव्ह आढळले. तर आज 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज रुग्णसंख्या जरी जास्त असली त्यापेक्षा दुपटीने रुग्ण बरे झाले आहे. याशिवाय आज ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे.

आज आरोग्य विभागाने 421 व्यक्तींचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात 22 पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय आज 16 व्यक्तींचे रिपोर्ट यवतमाळहून पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 281 व्यक्तींची आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आली. व त्यांचे नमुने यवतमाळ येथे तपासणी करीता पाठवण्यात आले.

तालुक्यात सध्या 321 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंटर वर 19 रुग्ण उपचार घेत आहे तर 291 होम आयसोलेट आहे. एका रुग्णावर बाहेर उपचार सुरू आहे.

हे देखील वाचा:

पाणी पिण्याच्या बहाण्याने घरी जाऊन मुलीचा विनयभंग

वणीत दोन भंगारच्या दुकानावर प्रशासनाची कारवाई

Corona Update MaregaonLead Story
Comments (0)
Add Comment