आरसीसीपीएल कंपनी तर्फे अडेगाव ग्रामपंचायतीला सोलर लाईट

सरपंच सीमा लालसरे व सदस्यांच्या प्रयत्नांना यश

सुशील ओझा, झरी: अडेगाव विकासाच्या भूमिकेतून नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांनी आरसीसीपीएल सिमेंट कंपनीला निवेदना द्वारे सौरऊर्जा पथदिव्याची मागणी केली होती. कंपनीने सीएसआर फंडातून ग्रामपंचायतीमध्ये सौरऊर्जा पथदिवा दिला. आज दिनांक 17 मार्च रोजी स्थानिक नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी सरपंच सीमा लालसरे, ग्रा.प.सदस्य संतोष पारखी, वंदना पेटकर, संजय आत्राम, गंगा काटकर सोबतच स्थानिक नागरिक शिक्षक धोगळे, बालू पाचभाई, दत्ता लालसरे, राहूल ठाकूर, रमेश मडकाम, गजाजनन मडकाम, मारोती गोंडे, राहुल ठाकूर, लक्ष्मण केळझरकर, सपना काटकर व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा:

बळजबरीने देहविक्री करून घेणा-या महिलेला 2 वर्षांची शिक्षा

शेतमजुराची मुलगी झळकली स्कॉलरशीप परीक्षेच्या गुणवत्ता यादीत

Lead StoryRCCPL
Comments (0)
Add Comment