23 बेवारस दुचाकींचा 27 मार्चला पोलीस ठाण्यात जाहीर लिलाव

रविवारपर्यंत हक्क दाखल करण्याची मुदत

विवेक तोटेवार, वणी: वणी ठाण्यात गेल्या अनेक दिवसांपासून विविध गुन्ह्यात वाहनांची जप्ती करण्यात आली. मात्र ज्या वाहनांवर अद्याप कुणीही हक्क सिद्ध केलेला नाही. अशा दुचाकी वाहनांचा दिनांक 27 मार्च रोजी पोलीस ठाण्यात जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.

गुन्हात जप्त करण्यात आलेले काही वाहने कागदपत्रांची पूर्तता करून सोडविण्यात आली. परंतु अद्यापही 23 दुचाकीवर कुणीही आपला हक्क सिद्ध केलेले नाही. अशा दुचाकींचा 27 मार्च रोजी या दुचाकी वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.

वाहनावर हक्क सादर करण्यासाठी 21 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून याआधी कागदपत्राची पुर्तता करून हक्क दाखल करता येणार आहे. या जाहीर लिलावात भाग घेण्याचे आवाहन वणी पोलीस ठाण्याद्वारे करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

शेतमजुराची मुलगी झळकली स्कॉलरशीप परीक्षेच्या गुणवत्ता यादीत

आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण

Lead StoryPolice station
Comments (0)
Add Comment