गौराळ्याजवळ दुचाकीस अज्ञात वाहनाची धडक

दुचाकीस्वार गंभीर जखमी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील गौराळ्याजवळ एका दुचाकीस्वाराला एका अज्ञात वाहनाने संध्याकाळच्या सुमारास धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सदर व्यक्ती हा सालेभट्टी येथील रहिवाशी असून तो वणीहून सालेभट्टीला परतत असताना त्यांच्या गाडीला गौराळ्याजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला आहे.

सालेभट्टी येथील रहिवासी विठ्ठल नांदेकर हे वणी वरुन सालेभट्टीला परत येत असताना सायं साडेसहा वाजताच्या दरम्यान एका अनोळखी वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांना तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्नालयात दाखल करण्यात आले. अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना  पुढील उपचारासाठी यवतमाळला पाठविल्याची माहिती मिळत आहे.

Lead Story
Comments (0)
Add Comment