मोटरसायकलच्या धडकेत महिला दुचाकीस्वार गंभीर जखमी

 

जितेंद्र कोठारी, वणी : मोपेडवर घराकडे जात असलेल्या महिलेच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव मोटसायकलने जोरदार धडक दिली. या अपघातात मोपेडस्वार महिलेच्या डोक्याला मार तसेच डाव्या पायाला फ्रॅक्चर झाला. येथील ब्राह्मणी मार्गावर विवेकानंद शाळा समोर रविवार 15 ऑक्टो. रोजी सकाळी 9.30 वाजता दरम्यान ही घटना घडली. संजू उमेश कोचर (39) रा. पद्मावती नगरी वणी असे जखमी महिलेचे नाव आहे. जखमी महिलेचे पती उमेश कोचर यांनी यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात मोटसायकल चालक विरुद्ध 279, 337, 338 भादवि व मोटर वाहन अधिनियम 134 (A), 134 (B) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मोटरसायकल चालकाच्या शोधात पोलीस त्या मार्गावरील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करीत आहे. 

Lead Storytwo wheeler accidentWani