वनोजादेवी ते हीवरा (म) रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांची प्रचंड गैरसोय

रस्ता दुरुस्त न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा

गणेश रांगणकर, नांदेपेरा: वनोजा देवी ते हीवरा (म ) जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर ही अतिशय दयनीय असते. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्यांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हा रस्ता पंतप्रधान सड़कयोजने अंतर्गत तयार करण्यात आला. अल्पकालावधीतच हा रस्ता उखडला. यातील डाम्बर गायब झाले. रस्त्यावरती जागोजागी खड्डे पडलेत. दुचाकीस्वारांचे अनेकदा या खड्यांत पडून अपघात झालेत. अनेकजण जखमी झालेत. तरी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी.अशी मागणी गावकरी करीत आहे.अन्यथा आंदोलन करण्यात येईल.असा इशाराही या ग्रामस्थांनी दिला आहे.

devihiwraLead StorymessNandeperaRoadVanoja
Comments (0)
Add Comment