आमदारांच्या घरासमोरील खड्डा ठरतोय जीवघेणा

सुरेंद्र इखारे, वणी: वणीतील वडगाव रोडवर आमदाराच्या घरासमोरील मुख्य रस्त्यावर पाईप लाईनचा भलामोठा खड्डा पडला आहे. पाईप लाईन उखडल्याने हा खड्डा पडला आहे. त्यामुळे इथे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी या भागात वाहतूक करणा-यांना तसेच पायी पाचणा-यांना अडचण निर्माण झाली आहे.

वणी शहरातील अनेक भागातील नागरिकांची या रस्त्यावरून सारखी वर्दळ असते. तसेच या रस्त्यावरून अनेक शाळांचा मार्ग आहे. त्यामुळे शाळेत जाणा-या चिमुकल्यांना आणि विद्यार्थ्यांना कधी धोका होईल हे सांगता येत नाही.

रात्रीचे वेळी हा खड्डा अधिक जीवघेणा ठरतो. त्यामुळे पायी चालणाऱ्यात भीती निर्माण झाली आहे. तेव्हा या खड्ड्यामुळे व रस्त्यावरील चिखलामुळे अपघाताशी शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हा खड्डा आमदाराच्या घरासमोर असताना सुध्दा लोकप्रतिनिधींचे या खड्डयांकडे लक्ष नाही ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे.

हा भाग प्रभाग क्रमांक एक मध्ये येतो. त्यामुळे या भागातील नगरसेवक काय करीत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. तेव्हा या रस्त्याकडे लक्ष घालून या रस्त्यावरील खड्डा बुजवावा. तसेच जेसीबीने चिखल वाट मोकळी करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Lead StoryMLARoad
Comments (0)
Add Comment