धक्कादायक…! महिलेस 9 जणांनी केली मारहाण

परिसरात घडली माणूसकीला काळीमा फासणारी घटना

सुशील ओझा, झरी:-पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असेलेल्या दुर्भा येथील महिलेला गावतीलच ९ लोकांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली. सदर महिलेने याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन ला दिली आहे.

तक्रारीनुसार १२ मे रोज सकाळी ८.३० वाजता दुर्भा येथील महिला ललिता बद्दमवार (४०) ही आपल्या मजुरदारा सह बैलगाडीने शेतात जात असताना गावतीलच ९ लोकांनी बैलगाडी अडवून या मार्गाने बैलगाडी न्यायची नाही असे बोलून वाद घातला. अश्लील शिवीगाळ केली. मजूरदारास धमकवून दुसऱ्या मार्गाने हाकलले. महिलेने मी या मार्गानेच खूप वर्षांपासून जात आहे असे सांगताच महिलेला ९ लोकांनी केस पकडून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच पुन्हा या मार्गाने दिसले तर जिवाने ठार मारण्याची धमकी देत ते शेतात निघून गेले.

गैरअर्जदार शेतातून परत आल्यानंतर सदर महिलेच्या मुलालाही मारहाण केल्याचा तक्रारीत नमूद आहे. गैरअर्जदार हे गुंडप्रवृत्तीचे असलयामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे व अशा लोकांवर गुन्हे नोंद करून कार्यवाहीची मागणी केली आहे. ३ दिवस लोटूनही महिलेल्या मारहाण करणाऱ्या लोकांवर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Lead StoryWomanZari
Comments (0)
Add Comment