अंतीम संस्काराच्यावेळी प्रेत गेले वाहून

परसोनी फाट्याजवळ अपघातात झाला मृत्यू...

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पळसोनी जवळ रोडवर सोमवारी दुपारी झालेल्या अपघातात एक इसम जागीच ठार झाला. त्यांच्यावर नदीकाठी अंतिम संस्कार करण्यात येत होते.  दरम्यान नदीला पूर आल्याने मृतदेह वाहून गेला.

सीताराम बापूराव बेलेकर (57) हे पळसोनी येथील रहिवाशी आहे. ते भांदेवाडा येथे वेकोलिमध्ये नोकरी करायचे. आज दुपारी ते आपले कर्तव्य पार पाडून त्यांच्या मोपेडने (ऍक्टिव्हा) आपल्या परतत गावी परतत होतो. यावेळी यवतमाळ रोडवरील राजूर फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या क्रूझर वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ज्यामध्ये सीताराम यांच्या छातीला व डोक्याला गंभीर इजा झाली. त्वरित त्यांना वणीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना चंद्रपूर येथे रेफर केले. पोलिसांनी या घटनेबाबत कलम 279, 304 (अ) नुसार गुन्हा दाखल केला. चंद्रपूर येथे जात असतांनाच वाटेत सीताराम यांचा मृत्यू झाला.

प्रातिनिधिक फोटो

अन् प्रेत वाहून गेले…
मृत्यूनंतर पोलीस कारवाई पूर्ण करण्यात आली. पळसोनी येथील नदीकाठावर त्यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार सुरू झाला. दरम्यान पावसाने हजेरी लावली. प्रेत अर्धे जळाले असतानाच नदीचे पाणी वाढले व त्या पाण्याने प्रेत वाहून नेले. गावकऱ्यांनी प्रेताचा शोध घेतला परंतु प्रेत मिळून आले नाही.

सीताराम यांना चार अपत्य आहेत ज्यामध्ये दोन मुली व दोन मुले आहेत. ज्यामध्ये दोन्ही मुलींचा विवाह झाला आहे. तर मुलांपैकी एका मुलाचा विवाह झाला असून एक मुलगा अविवाहित आहे. वडिलांच्या अचानक झालेल्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब दुःखात आहे. तर या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Lead StoryParsoni
Comments (0)
Add Comment