बहिणीच्या गावाला जाताना भावाचा अपघात

सावंगी येथील इसमाचा अपघातात मृत्यू

पंकज डुकरे, कुंभा: बहिणीच्या गावाला जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञान ट्रकच्या जबर धडकेत एक ठार झाल्याची घटना काल 14 च्या रात्री 8:30 वाजताच्या दरम्यान (करंजी पांढरकवडा हायवे) साखरा गावाजवळ घडली.

मारेगाव तालुक्यातील सावंगी येथील ऋषी मडावी वय 45 असे मृतकाचे नाव आहे. काल मारेगाव येथील आढावा बैठक आटोपुन मृतक बहिणीच्या गावाला जात असताना अज्ञान ट्रकने जबर धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. याबाबत करंजी पोलीस पुढील तापस करीत आहे.

KumbhaLead StoryMaregaon
Comments (0)
Add Comment