केसुर्ली फाट्याजवळ बाईकला अपघात

एक ठार तर एक जण जखमी
बंटी तामगाडगे, वणी: शुक्रवारी दिनांक 15 जूनला केसुर्ली फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे. दुपारी सव्वाचार ते चाडेचार दरम्यान ही घटना घडली.

 

संजय जुमडे (48) रा. तुकुम चंद्रपूर हे वणी वरून त्यांच्या मित्रासोबत चंद्रपूरला जात होते. केसुर्ली फाट्याजवळून जाताना रोडला असलेल्या दुभाजकाला त्यांची बाईक धडकली व त्यांच्या गाडीला अपघात झाला. यात संजय हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मित्र किरकोळ जखमी झाला आहे.
kesurli phataLead Story
Comments (0)
Add Comment