मारेगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वणी बहुगुणी डेस्क, मारेगाव: मारेगाव येथील एका 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शंकर कवडू गजभिये (25) असे मृतक तरुणाचे नाव असून तो मारेगाव येथील वार्ड क्रमांक 12 धामणी रोड येथील रहिवासी होता. तो अविवाहित होता व धामणी रोडवर पानटपरी चालवायचा. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शंकरने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. शंकरच्या पश्चात आई वडील, दोन भाऊ, एक बहीण असा आप्त परिवार आहे.

Lead StorySuicide