नातीला शाळेत सोडायला गेलेले आजोबा झाले गायब

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील सुरेश चिंतू गोरे (52) हे 15 फेब्रुवारी 2018 सकाळी 10 वाजता दरम्यान आपल्या नातीला शाळेत सोडण्याकरिता गेले. तर घरी परतच आले नाही खूप वेळ वाट पाहिल्यानंतर घरी, शेजारी, परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु ते मिळाले नाही. अखेर मुलगा अंकलेश गोरे याने मुकुटबन पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

गोरे घरी कोणत्याही सदस्याला काही न सांगता निघून गेले व परतले नाहीत अशी तक्रार त्यांनी पोलिसात केली. जमादार प्रवीण ताडकोकुलवर व स्वप्नील बेलखेडे यांनी नागपूर ,कोठा, चंद्रपूर व इतर ठिकाणी शोध घेतला. परंतु सुरेश गोरे सापडले नाहती. कुणाला आढळल्यास मुकुटबन पोलीस स्टेशला 07237-234241 या क्रमांकावर संपर्क करण्याची विनंती केली आहे.

Lead Storylost and foundsuresh goreWaniZari
Comments (0)
Add Comment