वणीत मॅराथान रॅलीला उर्त्स्फूत प्रतिसाद

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः ओबीसी परिषद वणीच्या वतीने अभिवादन मॅराथन रॅली आयोजित करण्यात आली. या माध्यामातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एक नावीण्यपूर्ण अभिवादन याप्रसंगी करण्यात आले. रॅलीच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांना मान्यवरांनी व उपस्थितांनी अभिवादन केल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सहभाग पाहुणे व शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. लहान वयोगटातील स्पर्धेत मुले व मुली यांना प्रत्येकी तीन पारितोषिक देण्यात आले. त्यात प्रथम क्रमांक सोनम चंदेल द्वितीय मृणाली पिंपलशेंडे, तृतीय वैष्णवी तामिलवार तर मुलाच्या गटात प्रथम क्रमांक रतन ताडशेट्टीवर, द्वितीय किशोर चंदेल तर तृतीय गणेश खोके यांना ट्रॅकसूट देऊन गौरविण्यात आले. तसेच खुल्या पुरुषगटात प्रथम क्रमांक शुभम बांगरे, द्वितीय रोहित येलादे, तृतीय धीरेंद्र चंदेल, संदीप उईके, प्रभात गोलेलवर यांना पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, प्रा. दिलीप मालेकर व बेलेकर सर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

या प्रसंगी परिसरातील सहभागी संघटनांचे पदाधिकरी उपस्थित होते ‘‘हान रट्टा जय हो’’ क्रीडा मंडळाचे योगेश खिवंसरा, राजूभाऊ तुराणकार, राजाभाऊ पाथरटकर, रवीभाऊ बेलूरकर, सौ. करुणाताई कांबळे या प्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रवीण खानझोडे, अखिल सातोकर, सिद्दीक रंगरेज, रावीभाऊ वांढरे, संतोष ढुमणे, पांडुरंग मोडक, राकेश वाघमारे, नितीन उकणकार, साधू गाऊत्रे, महेश पहापळे, सागर गडशेट्टीवर, अजय छल्लानी, संजय चिंचोळकर, बाळू रासेकर व मित्र परिवार यांनी विशेष सहकार्य केले.

induwananRally
Comments (0)
Add Comment