बस स्थानकाजवळ डीपीने घेतला पेट, सुदैवाने नुकसान नाही

वाढत्या तापमानाचा महावितरणला फटका

जितेंद्र कोठारी, वणी: मागील आठ दिवसांपासून तापमानमध्ये वाढ होताच त्याचा फटका सर्वसामान्यांसह महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या डीपीनाही बसत आहे. मंगळवारी 15 मार्च रोजी दुपारी 3 वाजता बस स्थानकजवळ हनुमान मंदिर परिसरात असलेल्या डीपीने अचानक पेट घेतला. डीपीमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच वीज कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित करून आग विजविण्याचे प्रयत्न केले. मात्र थोड्या वेळाने घटनास्थळी दाखल अग्नीशमन दलाच्या बंबानी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत डीपी वगळता कोणतीही वित्त हानी झाली नाही. डीपीला आग लागल्यामुळे बस स्थानक परिसराचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.

fire in DPLead Story