वडगाव टीप येथे शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वडगाव टीप येथे 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. श्रीकांत नात्थु झाडे (42) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव असून ते शेती करायचे.

आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास घरी कुणी नसताना श्रीकांत यांनी घराच्या लोखंडी रॉडला दोरी बांधून गळफास घेतला. त्याच्या मागे आई, दोन मुले, एक मुलगी व पत्नी असा मोठा आप्तपरिवार आहे. त्याच्यावर सेंट्रल बँकेचे 90 हजार रुपये कर्ज असल्याची माहिती आहे. तसेच त्यांची पत्नी ही चार महिण्यापासून माहेरी आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

हे देखील वाचा:

वणीत कोरोनाचा विस्फोट, आज 19 पॉजिटिव्ह

गांधी चौक येथील व्यापारी संजय बाबूलाल मुथा यांचे निधन

Farmer Suicide WaniLead StoryWadgaon Tip
Comments (0)
Add Comment