भास्कर राऊत,मारेगाव: एका 20 वर्षीय नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण मारेगाव शहर हादरले आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीचे नाव लखन रावत आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की पीडित ही मारेगाव येथील रहिवासी असून आज दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते 11 वाजताच्या सुमारास ती घरी जात होती. दरम्यान ती आरोपी लखन रावत (20) याच्या घराजवळून जात असताना त्याने पीडितेला घरी बोलावले. मात्र त्याला पीडितेने नकार दिला. त्यावर आरोपीने मुलीला जबदरस्तीने घरी ओढत नेले व घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
झालेल्या प्रकारामुळे पीडितेने रडायाल सुरूवात केली. त्यामुळे आरोपीने कुणाला सांगितल्यास सोडणार नाही अशी धमकी दिली. दुसरीकडे पीडिता घरी न आल्याने पीडितेची आई ही पीडितेला शोधत होती. दरम्यान ती आरोपीच्या घराजवळ आली. आई आरोपीच्या घराजवळ आल्याचे कळताच पीडितेने आईला आवाज दिला. त्यामुळे पीडितेची आई आरोपीच्या घरी आली. आई घरी येताचे तीने झालेला प्रकार तिला सांगितला. तेव्हा तिची आई रडायला लागली. दरम्यान घरासमोर आजूबाजूचे लोक गोळा झाले.
घराजवळ लोक गोळा झाल्याने आरोपी लखनने तिथून पळ काढला. झालेल्या प्रकारामुळे पीडितेने आईवडिलांसोबत मारेगाव पोलीस स्टेशन गाठले व आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंविच्या कलम 376, 376 (3), 506 सहकलम पोक्सो 4 व 6 कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लगेच पसार झालेल्या आरोपीला वणी येथून अटक केली आहे.