मारेगाव येथील आयेशा आकाश भेले यांचे निधन

नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू, मारेगावात हळहळ

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथील एका महिलेचे डेंग्यू सदृष्य आजाराने निधन झाले. आयेशा आकाश भेले (31) असे महिलेचे नाव आहे. त्या मारेगाव येथील प्रतिष्ठीत नागरिक आकाश भेले व माजी नगरसेवक सुरेखा भेले यांच्या त्या स्नुषा होत्या.

मारेगाव येथील वार्ड क्रमांक 14 मध्ये आयेशा या आपल्या कुटुंबासह राहायच्या. 4 दिवसांआधी त्यांची तब्येत अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आले होते.

मात्र सोमवारी मध्यरात्री 2 वाजताच्या दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज सकाळी 11 वाजता स्थानिक स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. आयेशा यांच्या पश्चात एक मुलगा, पती व मोठा आप्तपरिवार आहे. आयेशा यांच्या एकाएकी मृत्यू मुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Lead StoryMaregaonnidhan varta