‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभागी व्हा !

विजय चोरडिया यांचे वणी विधासभेतील जनतेला आवाहन

बहुगुणी डेस्क, वणी: केंद्र सरकारच्या वतीने यावर्षी ‘घरोघरी तिरंगा’ हे देशव्यापी अभियान राबविण्यात येत आहे. देशाभिमान वाढविणाऱ्या या अभियानात मोठ्या संख्येत स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवा, असे आवाहन भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी केले.

वणी बहुगुणीशी बोलताना विजय चोरडिया म्हणाले की देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या देशाप्रती दिलेल्या योगदानाचा संदेश घरोघरी पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने हर घर तिरंगा हे अभियान राबवले आहे. त्यामुळे या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विजय चोरडिया यांनी केले.

Lead StoryVijay Chordiya