बंद घरांवर चोरट्यांची नजर, पटवारी कॉलोनीत डल्ला

सावधान... बंद घर चोरट्यांच्या रडावर....

विवेक तोटेवार, वणी: शहरातली बंद घरांवर चोरटे नजर ठेवून आहेत. संधी साधून अशा घरांवर ते डल्ला मारतात. नुकताच वणी जवळील लालगुडा येथे असाच प्रकार घडला. पटवारी कॉलनीतील एक घर काही दिवसांपासून बंद होते. तोडणी घर फोडून तिथला टीव्ही लंपास केला. ही बाब 9 ऑगस्टला घर मालकाचे लक्षात आली. त्यानंतर त्यांनी वणी पोलिसात त्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार विविध कलमान्वये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत.

घरमालक लक्ष्मी अभरचंद जैन (55) आपल्या दोन मुलांसोबत लालगुडा येथील पटवारी कॉलनी आपल्या दोन मुलांसोबत राहतात. काही महिन्यांपूर्वी त्या आपल्या मुलांसोबत व्यावसायिक कामानिमित्त हैदराबाद येथे स्थायिक झाल्यात. त्यामुळे त्यांचे पटवारी कॉलनी येथील घर बंद होते. या घराकडे त्यांच्या भावाचा मुलगा अधून मधून लक्ष ठेवत होता. 9 ऑगस्टला लक्ष्मी यांच्या मुलाच्या मित्राने त्यांच्या घरी चोरी झाल्याचे कळवले. लक्ष्मी आपल्या मुलांसोबत तातडीने वणीला पोहोचल्या.

घरी येऊन पाहताच त्यांना धक्का बसला. घरातील सर्व सामान असाव्यस्त पडलेले होते. भिंतीवरील 30 हजार रुपये किमतीचा इंटेक्स कंपनीचा 43 इंची टीव्ही चोरट्यांनी लंपास केला. त्यांनी त्वरित पोलिसात याबाबत तक्रार दिली. लक्ष्मी यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध बीएनएसनुसार गुन्हे नोंदवण्यात आलेत. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

Lead StoryPatwari Colony