बसमध्ये अल्पवयीन मुलीला छेडणाऱ्या युवकास चोप

खातेऱ्याजवळ लोकांनी चांगलेच बदडले...

सुशील ओझा, झरी: मुकुटबन ते चंद्रपूर जाणाऱ्या शासकीय बसमध्ये अल्पवयीन मुलीला छेडणाऱ्या युवकाला लोकांनी चांगलेच बदडल्याची माहिती आहे. सदर युवक कृष्णानपूर येथील असल्याची माहिती आहे.

मुकुटबन येथून दुपारी ३ ते ४ वाजता दरम्यान चंद्रपूर करीता बस निघाली. या बसमध्ये कृष्णानपूर ता वणी येथील एक ३५ वर्षीय युवक प्रवास करीत होता. तो युवक बसमध्ये एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडखणी करीत असल्याचे काही सुज्ञ लोकांच्या लक्षात आले.

बसमधल्या लोकांनी खडकी स्टॉपवर बस थांबवली. तिथे सदर युवकाला उतरवले. व चांगलेच बदडले. छेड करणारा युवक हा दारू ढोसून असल्याची माहिती समोर येतय. ही मारहाण इतकी बेदम होती की यात त्याचा जीव जाईल की काय अशी शंका अडेगावचे संजय दातारकर व कोसाऱ्याचे सचिन गोडे यांना आली.

त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयन्त करून पोलिसांना संपर्क साधला व त्या नराधमाला पोलिसांच्या सुपूर्द केले. सदर व्यक्तिविरुद्ध तक्रार न करता समज देऊन सोडून दिले आहे.

khateraLead StoryWoman MolestationZari
Comments (0)
Add Comment