वणीत धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

रविवारी आणि सोमवारी राष्ट्रवादीतर्फे सामाजिक उपक्रम

सुरेंद्र इखारे, वणी: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दिनांक 15 जुलैला सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा रोड येथे 44 झाडे लावण्यात येणार आहे. तर सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे.

सोमवारी दुपारी आदर्श हायस्कुल येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पक्षाशी जुळू इच्छीणा-या लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी केले.

Dhananjay MundeDr Mahendra lodhaLead Story
Comments (0)
Add Comment