29 जुलैला नगर वाचनालयात वत्कृत्व स्पर्धा

25 जुलैपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

सुरेन्द्र इखारे, वणी: वणी येथील नगर वाचनालयात दिनांक 29 जुलैला दुपारी 2 वाजता वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नगर वाचनालय आणि संस्कार भारती समिती यांच्या संयुक्त विद्यामाने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दोन गट असून तिसरा गट महिलांसाठी आहे. शाळेतील 5 ते 7 च्या विद्यार्थ्यांसाठी अ गट आहे. तर 8 ते 10 साठी ब गट आहे. तर महिलांसाठीचा गट खुला आहे.

या वत्कृत्व स्पधेचा विषय ‘आदर्श गुरू’ आहे. स्पर्धकांना या विषयावर मराठी किंवा हिंदी भाषेत संभाषण करता येईल. यासाठी प्रत्येक विद्यर्थ्यांना 3 ते 5 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.

नोंदणी करण्याची अंतिम तारीख ही 25 जुलै आहे. नोंदणी अमीत उपाध्याय 9921625903 व रजनी पोयाम 9405705296 या नंबरवर करता येणार आहे. या स्पर्धेसाठी वणी शहरातील जास्तीत जास्त शाळेतील विद्यार्थी व महिलांनी भाग घ्यावा असे आवाहन संस्कार भारती समिती द्वारा करण्यात आले आहे

Lead StoryNagar WachnalaySanskar Bharti
Comments (0)
Add Comment