मारेगाव तालुक्याला दिलास, आज केवळ 1 पॉझिटिव्ह

64 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 14 में रोजी तालुक्याला चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह आढळला आहे. तर दुसरीकडे 64 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान तालुक्यातील नेत (वरुड) येथील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज 24 व्यक्तींची रॅपीड टेस्ट केली असता त्यात 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. आज 56 व्यक्तींनी आरटिपीसीआर टेस्ट केली असुन ते नमुने तपासणी करिता यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहे. दरम्यान आज आरटीपीसीआर टेस्टचा एकही रिपोर्ट यवतमाळहून प्राप्त झाला नाही.

तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 387 वर पोहोचली आहे. यापैकी 25 पॉझिटिव्ह रुग्ण मारेगाव येथील कोविड सेंटर वर उपचार घेत आहे. तर उर्वरित होम आयसोलेट आहेत. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तालुक्यात अचानक कोरोनाच्या उद्रेकानंतर आता दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे.

 हे देखील वाचा:

तालुक्यात ओसरतेय कोरोनाची लाट, रुग्णसंख्येत सातत्याने घट

कोरंबी (मा.)चे सरपंच विकास भोंगळे यांचे निधन

Corona Update MaregaonLead StoryMaregaon
Comments (0)
Add Comment