मारेगावात जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: राष्ट्रमाता जिजाऊ यांचा ४२० वा जयंती उत्सव मारेगाव येथे साजरा करण्यात आला. जिजाऊ चौकात मराठा सेवा संघ तालुका शाखा व मारेगावातील महिला पुरूषांनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मारेगावचे तहसीलदार विजय साळवे होते.

या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अनामिक बोढे, पोलीस पाटील तात्या चिकटे,माळी महासंघाचे कार्तिक शेंडे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष कुंदन पारखी, दिवाकर इंगोले, जिजाऊ ब्रिगेडच्या लिनाताई पोटे, सारिका कोल्हे,आशाताई बोढे,अपर्णा घागी,वर्षा घागी,कुळमेथे मॅडम,आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक अनामिक बोढे यांनी केले, संचालन प्रमोद लडके तर आभार ज्योतिबा पोटे यांनी केले, कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांना मिठाई वाटून जिजाऊ जन्मोत्सवाचा आनंद व्यक्त करण्यात आला.

Jijau JayantiLead StoryMaratha Seva SanghMaregaon
Comments (0)
Add Comment