तिनं घेतला घटस्फोट, तरीही नवरा गाजवतो हक्क…

महिलेंने केली पूर्व पती विरुद्ध मारहाणीची तक्रार

जितेंद्र कोठारी, वणी: नवऱ्याला दारूचे व्यसन आणि त्रासाला कंटाळून ‘तिनं’ दीड वर्षांपूर्वी त्याच्यापासून घटस्फोट घेतला. मात्र त्यानंतरही नवऱ्यानं महिलेला वारंवार त्रास व मारहाण करणे सुरूच ठेवले. अखेर पूर्व पतीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं बुधवार 11 नोव्हें. रोजी वणी पोलीस ठाण्यात पूर्व पती विरुद्द फिर्याद दाखल केली.

माहितीनुसार फिर्यादी महिला आपल्या दोन मुलीसह विद्यानगरी येथे राहते. खासगी नोकरी करून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. गेल्या दीड वर्षापूर्वी तिनं पतीपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटनंतर एक वर्ष ती दोन्ही मुलीला घेऊन संसाराचा गाडा हाकत होती. परन्तु गेल्या सहा महिन्यांपासून तिचा पूर्व पती घरी येऊन त्रास द्यायला लागला. काही दिवस महिलेंनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.

बुधवार 11 नोव्हें. 2020 ला सकाळी फिर्यादी महिला आपल्या दोन मैत्रिणीसह घराबाहेर उभी होती. त्याचवेळी तिचा पूर्व पती तिथं आला आणि त्याने तिच्यासोबत वाद केला. वादात त्याने तिच्या डोक्यावर दगडाने वार करून जखमी केलं.

जीवितास धोका असल्याची शक्यता असल्यामुळे पीडित महिलेंनी तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन आरोपी पूर्व पती विरुद्द तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी सचिन रामभाऊ सराफ (वय 35) रा. वणी विरुद्ध कलम 324, 504 नुसार गुन्हा दाखल केले आहे.

हे पण वाचा…

वेकोलि पदोन्नती प्रकरण: अधिका-याचे रंगेल चाळेही प्रसिद्ध

हे पण वाचा…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘दिवाळी बंपर’ ऑफरला सुरूवात

 

 

Lead Storywoman assult