श्रीराम व जन्नत संघात रंगला शेवटच्या चेंडूपर्यंत सामना… M ब्लास्टरचा धावांचा डोंगर

रवी राजूरकर, शोएब खानची धडाकेबाज बॅटिंग तर लखन आत्रामने उडवली बॅट्समनची दाणादाण

विवेक तोटेवार, वणी: आज लीगच्या सहाव्या दिवशीही T-10 चॅम्पियनची रंगत सुरूच होती. आज श्रीराम वॉरिअर्स आणि जन्नत 11 यांच्यातील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. तर रवी राजूरकर यांनी 20 चेंडूत धडाकेबाज 40 रन्स केलेत. अखेरचा सामना एम ब्लास्टरच्या धडाकेबाज बॅटिंगने गाजवला. त्यांनी 3 बाद 118 धावांचा डोंगर रचला. आज झालेल्या मॅचनुसार आमेर 11 हा अद्यापही अव्वल स्थानी आहे. तर दुस-या क्रमांकावर राजपूत रॉयल्स व माऊली मराठा संघ आहे. वणीत होणा-या या रंगतदार सामन्यात प्रेक्षक म्हणून सहभागी होऊन लाईव्ह मॅचचा वणीकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन T-10 लीगचे संचालक ऍड कुणाल चोरडिया यांनी केले. पारसमल प्रेमराज ज्वेलर्सतर्फे या चॅम्पियन लीगचे आयोजन करण्यात आले आहे. 

पहिला सामना हा जय महाकाली संघ विरुद्ध राजपूत रॉयल्स संघ यांच्यात खेळला गेला. आज जय महाकाली चांगलीच निराशा केली. या संघाच्या कोणत्याही खेळाडुला आज सूर गवसला नाही. त्यांनी प्रथम फलंदाजी करीत निर्धारित 10 ओव्हर्समध्ये अवघ्या 8 बाद 48 धावा केल्या. जय महाकाली संघाकडून सर्वाधिक 11 धावा सतीश तुराणकर याने केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणताही खेळाडूला 10 पेक्षा अधिक रन्स काढता आले नाही. 49 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना राजपूत रॉयल्स संघाची सुरवात चांगली झाली. राजपूत संघाने 1.4 ओव्हर मध्ये बिनबाद 19 धावा केल्या. मात्र मॅच सुरू असताना पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे नियमानुसार राजपूत रॉयल्स संघाला विजयी घोषित करण्यात आले.

रंगतदार ठरला दुसरा सामना
दुसरा सामना हा जन्नत 11 विरुद्ध श्री राम वॉरीअर्स यांच्यात खेळला गेला. जन्नत 11 ने प्रथम फलंदाजी करीत 9 बाद 86 धावा केल्या. जन्नत संघाकडून सैफुर रहेमान याने 7 चेंडूत 2 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 20 धावा केल्या. 87 धावांचा पाठलाग करतांना श्रीराम वारीअर्स संघाची सुरवात खराब झाली. ओपणार धीरज घुले भोपळाही न फोडता तंबुत तरतला. श्रीराम संघाकडून मारोती परचाके याने सर्वाधिक 22 धावा केल्या.

शेवटच्या षटकाने वाढवली मॅचची उत्कंठा
श्रीराम संघाने 9 ओव्हर्समध्ये 75 धावा केल्या. त्यांना आता 6 चेंडूत 12 धावा हव्या होत्या. यावेळी गेल्या सामन्याचा हिरो शुभम मदान मैदानावर होता. तर दुस-या बाजूने शेवटचे षटक हर्ष भारवानी घेऊन आला. पहिल्या 2 चेंडूत 3 धावा निघाल्या. आता 3 चेंडूत 9 धावा हव्या होत्या. मात्र दोन चेंडूत अवघ्या 3 धावाच काढता आल्या. शेवटच्या चेंडूत 7 धावा हव्या होत्या. परंतू शेवटच्या चेंडूत गडी धावबाद झाला. व श्रीराम संघाला 9 बाद 80 धावाच काढत्या आल्या. हा सामना जन्नत 11 ने 7 धावांनी जिंकला. सामन्याचा सामनावीर माऊली संघाचा सैफुर रहेमान याला ठरविण्यात आले. त्याने 7 चेंडूत 20 धावा केल्या.

तिसरा सामना हा माऊली मराठा विरुद्ध 11 टायगर रोअरिंग यांच्यात खेळल्या गेला. 11 टायगर रोअरिंग संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करीत निर्धारित 10 षटकात सर्व संघ बाद 65 धावा केल्या. हे लक्ष कमी वाटत असले तरी माऊली संघाच्या गोलंदाजांनी कालसारखी पुन्हा आपल्या बॉलिंगची कमाल दाखवली. निखिल तेलंग, लखन आत्राम, प्रतीक मत्ते यांनी कसून गोलंदाजी करीत टायगर संघाचे कंबरडे मोडले. टायगर संघाला 8 गडी गमावून 59 धावाच केल्या. या सामन्याचा सामनावीर लखन आत्राम याला ठरविण्यात आले. त्याने फलंदाजीत 7 धावा तर गोलंदाजीत 2 षटकात 12 धावा देत 3 गडी बाद केले.

मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना लखन

प्रेक्षकांनी लाईव्ह मॅचचा आनंद घ्यावा – ऍड. कुणाल चोरडिया
वणी शहराच्या इतिहास होणा-या सर्वात मोठ्या व भव्यदिव्य स्पर्धेला वणीकरांचा जो प्रतिसाद मिळत आहे तो अभूतपूर्व आहे. रोज एकापेक्षा एक आणि रंगतदार मॅच होत आहेत. हा थरार वणीकरांनी मैदानात येऊन अनुभवला पाहिजे. विशेष म्हणजे महिला व कुटुंबीयांसह सामने बघण्यासाठी येणा-या प्रेक्षकांची खास व्यवस्था करण्यात आली आहे. वणीत होणा-या या रंगतदार सामन्यात प्रेक्षक म्हणून सहभागी होऊन या ऐतिहासिक लीगचे अधिकाधिक लोकांनी साक्षिदार व्हावे. 
– कुणाल चोरडिया, संयोजक, T-10 लीग

चौथा सामना हा आमेर नाईट रायडर विरुद्ध छत्रपती वॉरिअर्स यांच्यात खेळला गेला. आमेर संघाने प्रथम फलंदाजी करीत निर्धारित 10 षटकात 92 धावा केल्या. आमेर संघाकडून कर्णधार रवी राजूरकर याने 20 चेंडूत 4 चौकार व 2 षटकार हाणत धडाकेबाज 42 धावा केल्या. 93 धावाच्या लक्षाचा पाठलाग करताना छत्रपती संघाला 8 बाद 75 धावांपर्यतच मजल मारता आली. छत्रपती संघाकडून विपुल पोटे याने सर्वाधिक 29 धावा केल्या. हा सामना आमेर संघाने 17 धावांनी सहजतेने जिंकला. सामन्याचा सामनावीर रवी राजूरकर याला ठरविण्यात आले.

मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना कर्णधार रवी

मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना कर्णधार रवीपाचवा सामना हा एम ब्लास्टर विरुद्ध रेनबो क्रिकेट क्लब यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करीत एम ब्लास्टर संघाने अक्षरशः धावांचा डोंगर उभा केला. त्यांनी 3 बाद 118 धावा केल्या. एम ब्लास्टर संघाकडून श्रीकांत टिपले 26, सौरभ पिदूरकर 32, व कर्णधार शोएब खान याने 13 चेंडूत धडाकेबाज नाबाद 32 धावा केल्या. तर रेनबो संघाला मात्र हा धावांचा डोंगर सर करणे सुरुवातीलपासूनच जड गेले. रेनबो संघाकडून काही काळ कर्णधार मॉन्टी याने कडवा प्रतिकार केला. परंतु तो आपल्या संघाला प्रराजयापासून वाचवू शकला नाही. रेनबो संघाला 7 बाद 78 धावाच करता आल्या. हा सामना एम ब्लास्टर संघाने सहजरित्या 40 धावांनी जिंकला. सामन्याचा सामनावीर शोएब खान याला ठरविण्यात आले.

 

अंकतालिका
1) आमेर नाईट रायडर – 9
2) राजपूत रॉयल्स – 8
3) माऊली मराठा – 8
4) एम ब्लास्टर -7
5) जन्नत 11 -7
6) रेनबो -6
7) श्री राम वारीअर्स – 6
8) जय महाकाली – 5
9) टायगर रोअरिंग – 4
10) छत्रपती वारीअर्स- 0

पाहा दिवसातील संपूर्ण मॅचेस..

Lead StoryT-10T10 Champions League Wani