संत रविदास स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम

संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच आणि महासंघाचे आयोजन

जब्बार चीनी, वणी: येथील संत रविदास सभागृहात समतेचे दूत संत रविदास यांच्या स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम झाला. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अगदी साध्या पद्धतीने झाला.

भारत देशातील अग्रणी समाजसुधारक, समतेचे दूत, संत रविदास यांच्या विचारांचा प्रभाव संपूर्ण भारत देशातील इतिहासात वाचावयास मिळतो. या महान व्यक्तीचा सोमवारी स्मृतिदिन होता. संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच, वणी व राष्ट्रीय चर्मकार महासंघ(वणी विभाग) तर्फे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

या वेळी दौलत वाघमारे, रवी धुळे, किशोर हांडे, अमोल बांगडे, महेश डुबे, चंदा गिरडकर, सोनी कुरील ,श्याम गिरडकर, किसन कोरडे, महेश लिपटे हे हजर होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Lead StorymahasanghravidasSantsmrutidin. abhivadanyuva manch
Comments (0)
Add Comment