भास्कर राऊत, मारेगाव: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) मारेगाव या समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद ढवस यांची निवड करण्यात आली आहे. मारेगाव येथील पंचायत समितीचे सभागृहात घेण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते. ज्ञानेश्वर चिकटे, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मारेगाव, तिकारे, कृषी अधिकारी मारेगाव उपस्थित होते. 9 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता सभेला सुरुवात झाली. यावेळी जयंत ठेपाले यांनी अध्यक्ष म्हणून प्रसाद ढवस यांचे नाव सुचविले. यावर गणेश झाडे यांनी अनुमोदन दिले. तसेच उपस्थित सर्व नवनियुक्त सभासदांनी एकमताने या नावाला समर्थन दिले. यावेळी नवनियुक्त “आत्मा” समितीच्या अध्यक्षांचे सर्वांनी स्वागत केले. सभेचे सुत्रसंचालन पारस्कर यांनी केले. सभेला आत्माचे नवनियुक्त सर्व सभासद उपस्थित होते.
हे देखील वाचा: