पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांना दिले लॉलीपॉप

पेट्रोल, डिजल दरवाढ विरोधात सरकारचा अनोखा निषेध

सुशील ओझा, झरी: भाजप सरकारने देशासह राज्यात पेट्रोल, डिजल व गॅसचे दर वाढवून सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. याचा निषेध म्हणून तालुका युवक काँग्रेस तर्फे झरी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याकरिता येणाऱ्या दुचाकीधारकांना लॉलीपॉप देऊन अनोखा निषेध केला आहे.

भाजप सरकारने देशातील जनतेला खोटे आश्वासन देऊन जनतेची फसवणूक केली  व आश्वासनाची  पूर्तता केली नाही. सरकारने पेट्रोल, डिजल व गॅस चे दर कमी करण्याचे लॉलीपॉप देशातील जनतेला दिले. त्याची आठवण जनतेला करून देण्याचा उद्देशाने काँग्रेसने पेट्रोल पंपावर लॉलीपॉप देऊन भाजप सरकारचा निषेध केला.

या आंदोलनानंतर निवेदन देण्यात आलं. इंधन दरवाढ कमी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा तहसीलदार अश्विनी जाधव यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. यावेळी वेळी  वणी विधानसभेचे उपाध्यक्ष सचिन टाले, महासचिव रोहित राऊत, राजू येल्टीवार, शेखर बोनगीरवार, राहुल धांडेकर, राकेश गालेवार, मिथुन सोयाम, सुनील मोहजे, नितीन देशेट्टीवार सह शेकडो काँगेस कार्यकर्ते उपस्थित होते.

.

Lead Story
Comments (0)
Add Comment