सोमवारी आलेत 5 पॉजिटिव्ह

एकालाही सुट्टी नाही सोमवारी

जब्बार चीनी, वणी: सोमवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी तालुक्यातून 5 पॉजिटिव्ह निघालेत. सोमवारच्या रिपोर्टनुसार पॉजिटिव्ह व्यक्ती मंदर 1, चिखलगाव 1 आणि वणीमधील 3 आहेत. आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 680 झाली आहे.

सोमवारी 21 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. अद्याप 58 अहवाल येणे बाकी आहेत. सध्या तालुक्यात एकूण 680 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 652 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 22 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या 20 झाली आहे.

सोमवारी एकाही कोरोनामुक्त व्यक्तीला सुट्टी

सोमवारी एकाही कोरोनामुक्त व्यक्तीला सुट्टी झाली नाही. सध्या तालुक्यात 22 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 7 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 18 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 5 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 7 व्यक्ती भरती आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

COronaCovid 19Lead StoryMondayReport
Comments (0)
Add Comment