अत्याधुनिक सोयी सुविधा असलेल्या सेव्हन स्टार फिटनेसचे शनिवारी उद्घाटन

फुल्ली एसी जिम, महिलांसाठी वेगळा वेळ व महिला ट्रेनर

विवेक पिदूरकर, वणी: धकाधकीच्या आणि या फास्ट फुडच्या जीवनात आरोग्याकडे सर्वसामान्यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. अनेकांना जिमची आवड असते. मात्र पुरेसे साहित्य उपलब्ध नसणे, पुरेशा सोयी, ट्रेनर नसणे यामुळे आरोग्याकडे अनेकांचे दर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन वणीत शनिवारी दिनांक 14 ऑगस्ट रोजी अत्याधुनिक सोयी सुविधा व फुल्ली एसी असलेल्या ‘सेव्हन स्टार फिटनेस’ या जिमचे उद्घाटन होत आहे. यवतमाळ रोडवरील सुगम हॉस्पिटल जवळ कल्पेश मॉलच्या वरील माळ्यावर हे फिटनेस सेन्टर आहे.

फिटनेस सेंटरचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी य.जि.म. बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, ठाणेदार वैभव जाधव, वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक आई डी जंक्यानी, चिखलगावचे सरपंच अनिल पेंदोर, संजय पिंपळशेंडे सभापती पं.स. व डॉ. शिरिष ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सेव्हन स्टार फिटनेस हा फुल्ली एसी असलेला शहरातील पहिला व एकमेव जिम आहे. अत्याधुनिक जिमच्या साहित्यांसह पॉव्हर कॉर्डिओ, स्टिम रूम इथे उपलब्ध आहे. जिममध्ये प्रशिक्षित ट्रेनर सभासदांना ट्रेनिंग देणार आहे. याशिवाय पर्सनल ट्रेनिंग, स्माल गृप ट्रेनिंग देखील डाएट स्टुडियो, न्युट्रिशन प्रोटिन्स सप्लिमेंट शॉप, इनडोअर कॅफेटेरिया इत्यादी सुविधा देखील या फिटनेस सेन्टरमध्ये उपलब्ध आहे.

महिलांनो जिम लावायचाय ? मग चिंता नाही…
शहरात महिलांसाठी जिम नसल्याने आवड असूनही अनेक फिटनेस प्रेमी महिलांना यापासून मुकावे लागते. मात्र या जिममध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या वेळ ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे महिलांनाही आता आपल्या फिटनेस व आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येणार आहे. जिममध्ये महिलांसाठी सकाळी 5 ते 6.30 व दुपारी 10.30 ते दु. 4 पर्यंतचा वेळ असणार आहे. विशेष म्हणजे महिलांसाठी महिला ट्रेनर प्रशिक्षण देणार आहे.

पुरुषांसाठी स. 6.30 ते 10.30 व दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत वेळ राहणार आहे. नवीन येणा-या सभासदांना सध्या काही दिवस स्पेशल डिस्काउंट देण्यात येणार आहे. शनिवारी दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 11 वाजता सेव्हन स्टार फिटनेस सेंटरचे उद्घाटन होत आहे. अधिक माहितीसाठी जिमला एकदा येऊन भेट द्यावी असे आवाहन संचालकातर्फे करण्यात आले आहे.

सेव्हन स्टार फिटनेस
पत्ता: कल्पेश मॉलच्या वर, सुगम हॉस्पिटलजवळ, यवतमाळ रोड, वणी (चिखलगाव)
अधिक माहितीसाठी संपर्क: 9021432930, 9823078075

Lead StorySeven Star Gym
Comments (0)
Add Comment