‘जेसीबी की खुदाई’ पडली महागात, डोळ्यादेखत चोरली दुचाकी

तहसील कार्यालयाजवळील घटना, मालकासमोरूनच चोरटा पसार

विवेक तोटेवार, वणी: चोरट्याने डाव साधत दुचाकी चोरून नेली. दुचाकी मालक ‘चोर चोर’ ओरडत राहिले, मात्र चोरटा वेगाने पसार झाला. ही घटना आज शनिवार 12 जून रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास दरम्यान तहसील कार्यालयाजवळ घडली. तहसील कार्यालय हे एक वरदळीचे ठिकाण आहे. त्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे. या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. मात्र चोरट्यांची केवळ या ठिकाणावरूनच नाही तर चक्क मालकाच्या डोळ्यादेखत चोरी करण्याची हिम्मत झाली.

देवानंद नंदराव धांडे हे गाडेगाव ता. मारेगाव येथील रहिवाशी आहे. ते जेसीबी चालक म्हणून काम करतात. आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास त्यांचे वणीतील तहसील कार्यालयाच्या मागे सुरू होते. त्यांनी त्यांची दुचाकी (MH29 AJ9249) तहसील कार्यालयाजवळ लावली व ते जेसीबीच्या कामात लागले. काम करीत असताना एक अज्ञात चोरटा त्यांची दुचाकी घेऊन जाताना त्यांना दिसला. देवानंद यांनी यावेळी आरडा ओरड केली. परंतु चोरटा दुचाकी घेऊन पसार झाला.

देवानंद यांनी वणी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे. आज सुटी असल्याने तहसील परिसरात वरदळ कमी होती. नेमकी हिच संधी साधत चोरट्याने डाव साधला.

हे देखील वाचा:

चोरट्यांनी फोडले वणीतील पोस्ट ऑफिस

इलेट्रिक शॉक लागून सोमनाळा येथे इसमाचा मृत्यू

दिलासा: आता तालुक्यात अवघे 16 ऍक्टिव्ह रुग्ण

Lead StoryTahsil office Wani