सर्वोदय चौकात इसमाचा मृत्यू

अती मद्य प्राशनाने मृत्यू ?

विवेक तोटेवार, वणी: वणीतील खडबडा येथे राहणाऱ्या एक 35 वर्षीय इसमाचा 12 मे सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. इसमास दारूचे व्यसन होते. त्यामुळे दारूच्या अती सेवनामुळे मृत्यू झाल्याचा कयास लावला जात आहे.

धनराज तुकाराम शेंदरे (35) हे खडबडा येथे आपल्या आईसोबत राहत होते. 12 मे रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ते सर्वोदय चौकात पडून असल्याचे लोकांना दिसून आले. पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. धनराज यांना त्यांना दारूचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे. त्याच कारणाने 2 वर्षांपूर्वी त्यांची पत्नी त्यांना सोडून गेल्याची माहिती आहे.

त्यांचा मृत्यू अती मद्य प्राशनाने तर झाला नाही याविषयी तर्क वितर्क लावले जात आहे. मात्र मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच कळू शकेल. त्यांच्या मृत्यूची तक्रार त्यांच्या बहीण मंदा नेहारे हिने वणी पोलिसात दिली आहे. तिच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी मर्ग नोंद केला आहे.

Lead StorySarvoday chauk
Comments (0)
Add Comment