मारेगाव तालुक्याला आज दिलासा..

42 रुग्णांनी केली कोरोनावर मात, आज 14 पॉजिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव:आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज 12 में रोजी तालुक्यात केवळ 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तालुक्यात रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. तर दुसरीकडे आज 42 रुग्णांनी कोरोनावर मात करीत बरे होऊन घरी परतले आहे.

तालुक्यात कोरोनाच्या उद्रेकानंतर आता दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 384 असून त्यापैकी 356 पॉझिटिव्ह रुग्ण होम आयसोलेट आहे. तर उर्वरित कोविड सेंटर व खाजगी मध्ये उपचार घेत आहे.

आज 481 व्यक्तींनी रॅपीड टेस्ट केली असता त्यात केवळ 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तर यवतमाळ वरून आरटिपीसीआर चे 605 रुग्णांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

हेदेखील वाचा

चार दिवसांत 470 लोकांची जाग्यावरच कोरोना टेस्ट

हेदेखील वाचा

आज तालुक्यात 64 पॉझिटिव्ह तर 97 रुग्णांची कोरोनावर मात

हेदेखील वाचा

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

corronacovid19Lead StoryMaregaonupdate
Comments (0)
Add Comment